Sunday 12 July 2015

संदीप गुंड यांची कार्यशाळा चिखलीत संपन्न ई-लर्निंग पॅटर्न राज्यासाठी आदर्श - राहुलभाऊ बोंद्रे

संदीप गुंड यांची कार्यशाळा चिखलीत संपन्न   ई-लर्निंग पॅटर्न राज्यासाठी आदर्श -  राहुलभाऊ बोंद्रे


अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाव्दारे आयोजीत या एकदिवसीय कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक संदीप गुंड यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम व खर्च वाचतो तसेच प्रचलीत शिक्षण पध्दतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना एकतर आमीष नाहीतर पनिश करतो, यामुळे विद्यार्थी फॉलोअर बनतात, यालाच आपण वर्तनवाद म्हणतो. परंतु आज आपल्या देशाने रचनावाद स्विकारून विद्यार्थ्यांना सृजनशिल व कल्पक बनविण्याची शिक्षण पध्दती स्विकारली असल्याचे सांगीतले. पारंपारीक शिक्षण पध्दतीला छेद देवून त्याऐवजी संकल्पनेचा व्हिडीओ जर विद्यार्थ्यांना दाखविला तर विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत भर पडून ती बाब त्यांच्या मनोपटलावर कायमची कोरल्या जाते. ही बाब हेरून गत तीन वर्षापुर्वी ई-लर्नींग प्रकल्पाची मुहुर्तमेढ चिखली रोवली आहे.. त्यात अधिकाधिक प्रगती करून राज्यात चिखलीचा एक आदर्श निर्माण करावयाचा आहे, असा विश्‍वास आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.
स्थानिक नटराज चित्र मंदिरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकरीता गरूडझेप शिक्षण प्रकल्पाअंतर्गत आयोजीत ई-लर्नींग कार्यशाळेच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पष्टेपाडा ता. शहापुर येथील डिजीटल स्कूलचे संदीप गुंड, जि.प.बांधकाम सभापती अंकुशराव वाघ, प.स.सभापती सत्यभामाताई डहाके, उपसभापती कोकीळाबाई परिहार, नंदकिशोर सवडतकर, न.प.उपाध्यक्ष म.आसीफ, गटविकास अधिकारी राजेश लोंखडे, गटशिक्षणाधिकारी राजपुत, विस्तार अधिकारी काळे, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई, अनुराधा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.बियाणी, अनुराधा तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्हि.एल.भांबेरे, महेंद्र थिमते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.अरूण नन्हई यांनी अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आ.बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षापुर्वी ई-लर्नींगची संकल्पना राबविण्यास सुरूवात झाल्याचे सांगून आजपर्यंत १00 शाळा ई-लर्नींग केल्याचे सांगीतले.
आज बुलढाणा चिखली येथे मा. श्री. संदीप गुंड सर(पष्टेपाडा शाळा) यांच्या कार्यप्रेरणेने यशस्वीरीत्या पार पडलेल्या डिजिटल कार्यप्रेरणा  याकार्यक्रमाला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.तसेच मा.आमदार राहूल भाऊ यांच्या समवेत 15 अधिकारी / पदाधिकारी यांनी हजेरी लावली.सभागृहाची जागा अपुरी पडल्यानंतर सभागृहाबाहेरील लावलेल्या screen वरून शिक्षकांनी कार्यशाळेचा आनंद घेतला व आपल्या अभिप्रायात प्रचंड प्रेरणा घेऊन जात असल्याचे सांगितले.






 

Thursday 30 April 2015

इंग्लिश स्पिकिंग कोर्स


गरुडझेप शिक्षण प्रकल्प अंतर्गत व शितल अकॅडमीच्या मदतीने तालुक्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदच्या शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुटीत मोफतइंग्लिश स्पिकिंग कोर्स'

Saturday 25 April 2015


शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाची निर्माण झालेली काळाची गरज लक्षात घेऊन शिक्षकांनी मराठी शिक्षणात नवचैतन्य निर्माण करावे.विद्यार्थ्यांसाठी स्वत: शिक्षकांनी  संगणकीय शैक्षणिक साधने निर्माण करून विद्यार्थ्याचे ज्ञान विश्व समृद्ध करावे शिक्षकांनी आता फक्त सिटीझन न होता नेटीझन व्हावे   असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री राहुलभाउ बोंद्रे यांनी दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी श्री शिवाजी डि.एड कॉलेज ,चिखली येथे तंत्रस्नेही शिक्षकांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत व्यक्त केले . कार्यशाळेला बुलडाणा जि.प मधील तेराही पंचायत समितीतील जवळपास साठ  शिक्षक उपस्थित होते.हिंगोली तसेच जळगाव जिल्हयाची शिक्षकही उपस्थित होती हे विशेष .  चिखली पं.स चे शि.वि.अ. श्री काळे साहेब ,श्री शिंदे साहेब  ,केंद्र प्रमुख श्री गावडे ,शि.वि.अ.मेहकर दिपक सवडतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  सकाळी दहा वाजतापासुन सुरु झालेल्या कार्यशाळेत  सातारा  येथुन आलेले राज्यपुरस्कार प्राप्त जिप प्राथमिक शिक्षक  श्री बालाजी जाधव व श्री राम सालगुडे सर यांनी अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करत ब्लॉग कसा बनवावा,गुगल डॉक्स ,पी.पी.टी.,youtube वापर ,video uploading,video conference,google drive,hangout,photoshop  आणि इतर अत्यंत महत्वाचे SOFTWARE ची प्रात्यक्षिकसह ची माहीती दिली.  विशेष म्हणजे राज्याचे शिक्षण सचिव श्री नंदकुमार साहेब यांनी सर्वाना कार्यशाळा सुरु असताना SMS मार्फत शुभेच्छा दिल्या.
           कार्यशाळेच्या समारोपात चिखली विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री राहुलभाउ बोंद्रे यांनी गरूडझेप शिक्षण प्रकल्पासाठी या कार्यशाळेचा निश्चितच लाभ होणार असून  कार्यशाळेचे आयोजन तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र नादरकर व त्यांचे सहकारी यांनी  घडवुन आणल्यामुळे त्यांचे कौतुक आपल्या समारोपीय  भाषणातुन केले. गरूडझेप शिक्षण प्रकल्पाची आज संपुर्ण महाराष्ट्र कसा दखल घेतअसून.आ.राहुलभाउंचे गरूडझेप प्रकल्पातील योगदान याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी काळे यांनी सांगितली . आ.राहुलभाऊ    तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सत्येंद्र भुसारी  यांचे हस्ते सहभागी शिक्षकांना  शैक्षणिक SOFTWARE सीडीचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे बहारदार संचलन विजय मोंढे यांनी तर आभार प्रदर्शन अरुण गरुड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  बाळु गव्हाने प्रशांत वायकोस सागर  संजय सोनुने सतीश शिंदे सागर दंडेकर मधुकर सांळुके यांनी परिश्रम घेतले